Hunger strick Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : पूरग्रस्त समितीतर्फे आज पापाची तिकटी येथे उपोषण

जिल्ह्यात विकासकामांच्या नावावर चुकीची कामे केल्याचा फटका कोल्हापूरवासीयांना बसत आहे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात वर्षानुवर्षे पुराची परिस्थिती गंभीर होत आहे. बागायती शेतीसह रहिवासी, व्यापारी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. मानवनिर्मित असणाऱ्या पुरामुळे आणि चुकीच्या विकासकामांमुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढतच आहे. १३० गावांना याचा फटका बसतो, त्यामुळे पूरबाधित सर्वच गावांनी विकासकामांमध्ये बदल घडविण्यासाठी किंवा रस्ते, पूल करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती समजावून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी, पूरग्रस्त समितीच्यावतीने पापाची तिकटी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवार (ता. २९) सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक बाजीराव खाडे यांनी निवेदनाद्वारे दिली.

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील पूरबाधित गावांमधील लोकांच्या अंगावर शहारे येतात. हा महापूर नैसर्गिक नाही, तर मानवनिर्मित आहे. जिल्ह्यात विकासकामांच्या नावावर चुकीची कामे केल्याचा फटका कोल्हापूरवासीयांना बसत आहे. त्यामुळे पूर परिस्थितीचा शास्त्रीय अहवाल व तो तयार करताना पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करावी. पूरग्रस्तांची मते आणि भावना जाणून घेतली पाहिजे. हा अहवाल तत्काळ व गतीने तयार केला पाहिजे. पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा करणाऱ्या रस्त्यावर पूल, मोऱ्या, पाईपची कामे सुरू केली पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी निमंत्रण द्यावे, अशी मागणी खाडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT