कोल्हापूर

पा३

CD

गव्याच्या हल्ल्यात
पाटपन्हाळ्याचा शेतकरी जखमी
बाजारभोगाव, ता. १०: पोंबरे पैकी चव्हाणवाडी (ता. पन्हाळा) येथे शेतात गेलेल्या हिंदूराव केरबा पाटील (वय ५५, पाटपन्हाळा) या शेतकऱ्याच्या पोटात गव्याने शिंग खुपसल्याने गंभीर जखमी झाले. कोथळा बाहेर पडल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कोपार्डे (ता. करवीर) येथील चंद्रकांत पाटील यांची पोंबरे पाटबंधारे प्रकल्पाशेजारी '' रेवा'' नावाची शेतजमीन आहे. हिंदूराव पाटील यांच्याकडे ही जमीन कसण्यासाठी आहे. आज दुपारी शेताकडे जात असताना मागून अचानकपणे आलेल्या गव्याने हिंदूराव यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या पोटात शिंग खुपसले. ते गंभीर जखमी स्थितीत विव्हळत पडलेले असतानाच तेथे शेळ्या चारण्यासाठी आलेल्या चव्हाणवाडी येथील बाळू कातळे, राजू बुकम यांनी त्यांना जीपमधून येथे पोहाळे येथे आणले व तेथून १०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापुरतील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मानवाचे वनपाल अतुल मगदूम, वनरक्षक सुनील कांबळे, पूजा नरुटे आदी तातडीने सीपीआरमध्ये पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT