कोल्हापूर

घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांची परदेशातील प्रोजेक्टसाठी निवड

CD

01162
----
घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड
रूकडी, ता. ७ : अतिग्रे (ता. हातकणंगले) संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असलेल्या राजदीप कुलकर्णी (दहावी), विश्वजित चव्हाण (नववी) व मनस्वी पाटील (बारावी) या विद्यार्थ्यांची अनुक्रमे जपान, इंग्लंड, बेल्जियम व ब्राझिलमध्ये ए एफ एस उपक्रमाच्या प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे.
राजदीप याची आशिया, काकेहसी, जपान येथे एक वर्षासाठी निवड झाली आहे. राजदीपला जपानमधील या एक वर्षाच्या शिक्षणासाठी पूर्ण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. ग्लोबल स्टेम उपक्रमांतर्गत विश्वजित चव्हाण याची निवड बेल्जियम व इंग्लंड या दोन देशांसाठी झाली आहे. मनस्वी पाटील या विद्यार्थिनीची निवड ब्राझिलमध्ये झाली आहे. विश्वजित व मनस्वी यांना शाश्वत विकास प्रोजेक्टमध्ये तीन महिन्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी पूर्ण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तीन महिने ते दोघे परदेशात राहून शाश्वत विकास प्रोजेक्टवर काम करणार आहेत. विद्यार्थ्यांना संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांची प्रेरणा मिळाली. ए एफ एस समन्वयक इंद्रजीत थोरात यांचे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT