कोल्हापूर

रास्ता रोको.. इशारा..

CD

कोल्हापूर-सांगली रस्ता दुरुस्तीसाठी डेडलाईन
हातकणंगलेत रास्ता रोकोचा इशारा; घोडावत विद्यार्थी परिषदेतर्फे अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. ७ ः कोल्हापूर-सांगली रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे, वेडीवाकडी वळणे यामुळे रोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे. २० एप्रिलपर्यंत रस्ता दुरुस्त झाला नाही तर हातकणंगले बसस्थानक चौकात रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्याची प्रत येथील सहायक अभियंता आणि पोलिस निरीक्षकांना दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे, सांगली-कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मार्गावरच अतिग्रे येथे संजय घोडावत विद्यापीठाचा कॅम्पस आहे. मार्गावर शिक्षण संकुलात शिकणारी मुले, शिक्षक व इतर स्टाफ त्यांच्या वाहनाने ये-जा करत असतात. हातकणंगले येथे या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने दुचाकी चालवणाऱ्यांना रोज अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वारंवार सांगूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याचे काम अद्याप पूर्ण नाही. दरवर्षी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून व्हॅट, इन्कमटॅक्स, जीएसटी, रोड टॅक्स व इतर टॅक्स मिळून ५००० कोटींवर टॅक्स भरला जात आहे. शासनाला एवढा महसूल मिळूनही नागरिकांना हव्या त्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. रोजचे होणारे अपघात नागरिक, विद्यार्थी, पालक, स्टाफ यांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून हा रस्ता २० एप्रिलपर्यंत सुस्थितीत करावा, अशी मागणी विद्यार्थी परिषदेने निवेदनात केली आहे. २० एप्रिलपर्यंत रस्ता सुस्थितीत झाला नाही तर शिक्षक, विद्यार्थी, पालक व विद्यापीठ व्यवस्थापन हातकणंगले येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT