कोल्हापूर

जाहिरात समाजाचे प्रतिबिंब

CD

03193
----------
जाहिरात समाजाचे प्रतिबिंब
उदय गोडबोले; व्यंकटेश महाविद्यालयात कार्यशाळा
इचलकरंजी, ता. ७ : औद्योगिक क्षेत्रामध्ये जाहिरातींचे खूप मोठे स्थान आहे. उत्पादन झालेल्या प्रत्येक मालास ग्राहक मिळवण्यासाठी तसेच आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात हे माध्यमाचे कार्य करत असते. जाहिरात बनवताना प्रत्येक बाबीचा विचार करावा लागतो. जाहिरात एक माध्यम नाही, तर समाजाचे प्रतिबिंब आहे, असे प्रतिपादन आर. आय. टी. इस्लामपूर येथील उदय गोडबोले यांनी केले.
श्री व्यंकटेश महाविद्यालयात आयोजित ‘जाहिरातीच्या विश्वात’ या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रथम सत्रात श्री. गोडबोले यांनी सामाजिक व व्यावहारिक जाहिराती बनवणे या विषयावर मार्गदर्शन करत जाहिरात बनवताना घ्यावयाची काळजी, माध्यमाची निवड, जाहिरातीचा होणारा परिणाम अशा विविधांगांनी जाहिरातीबाबत विश्लेषण केले.
द्वितीय सत्रात ‘जाहिरातीमधील कायदेशीर आणि नैतिक समस्या’ या विषयावर प्रोफेसर डॉ. एन. एम. मुजावर व डॉ. एस. एन. जरंडीकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन वक्त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने होते. प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. एस. आर. ठाकर यांनी करून दिली. प्रथम सत्राचे आभार डॉ. एस. एच. आंबवडे, तर द्वितीय सत्राचे आभार डॉ. बी. एन. कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन मोहिनी आंचलीया हिने केले. यावेळी डॉ. डी. एस. कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

Mumbai News: कोठडीतील मृत्यू हृदयविकाराने! वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस दोषमुक्त, नेमकं प्रकरण काय?

प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! मुंबई लोकलच्या 'या' रेल्वे स्टेशनवर 'स्लीपिंग पॉड्स' सुरू होणार; काही तासांसाठी आरामाची खात्री

SCROLL FOR NEXT