कोल्हापूर

दोन गटात हाणामारी

CD

यड्रावात दोन गटांत तुंबळ हाणामारी
मंडप फाडल्याचा राग; आठ जण जखमी; १२ जणांवर गुन्हा
इचलकरंजी, ता. ७ : यड्राव (ता. शिरोळ) येथील रेणुकानगर भागात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. धार्मिक कार्यक्रमासाठी घातलेला मंडप फाडल्याच्या कारणावरून एकमेकांवर धावून जात दोन गटांत दगड, विटा फेकून हाणामारी झाली. मारहाणीत आठ जण जखमी झाले असून मंडपातील साहित्याची मोडतोड झाली आहे. शहापूर पोलिसांत दशरथ शिंदे यांच्या फिर्यादीनुसार आरीफ नदाफ, शायरा नदाफ, लैला नदाफ (रेणुकानगर) आणि अनोळखी अशा १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या गटाकडून फिर्याद देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी- यड्राव रेणुकानगर भागात राहणारे दशरथ शिंदे यांनी धार्मिक कार्यक्रमासाठी घरासमोर मंडप घातला होता. हा कार्यक्रम सुरू असतानाच तेथे मालवाहतूक टेंपो आला. या टेंपोने मंडप फाडल्याने काहींनी त्याला विचारणा केली. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन दोन्ही बाजूचे समर्थक जमले. दोन्ही गट एकमेकांना भिडले. त्यांच्यात दगड, विटा फेकून हाणामारी झाली आणि टेंपोचालकाच्या समर्थकांनी मंडपातील खुर्च्यांचीही मोडतोड केली. मारहाणीत दशरथ शिंदे, राकेश शिंदे, आशिष शिंदे, अनिकेत हेगडे, विद्या शिंदे, धोंडुबाई सोनुले, सौरभ सोनुले, छबाताई सोनुले जखमी झाले.
याप्रकरणी दशरथ शिंदे यांनी शहापूर पोलिसांत १२ जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. जखमींना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी आणले असता समर्थकांनी गर्दी केली होती. दुसऱ्या गटाकडूनही फिर्याद देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेनंतर रेणुकानगर भागात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन

Vasai Accident: शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबला; कारनं ९ जणांना उडवलं; वसईत होळीच्या रात्री थरार

Latest Marathi News Live Update : इंडोनेशियामध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Viral Video: आश्चर्यकारक तपश्चर्या! होळीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये तो थेट उतरला… पुढे जे घडलं ते पाहून सगळे थक्क

T20 World Cup: भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार नाही, संजू सॅमसन खेळला म्हणून उपांत्य फेरीत पोहोचले, नाहीतर...

SCROLL FOR NEXT