ST bus sakal
कोल्हापूर

लालपरी सहा महिन्यांनंतर मुक्कामाला!

गडहिंग्लजच्या फेऱ्या सुरळीत; आगाराला दिवसाला पाच लाख उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : तब्बल सहा महिन्यांनंतर लालपरी ग्रामीण भागात मुक्कामाला पोहोचली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने येथील आगारातील बहुतांश फेऱ्या सुरळीत झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तसेच या ठिकाणी रोज शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची वडापच्या आर्थिक भुर्दंडातून सुटका झाल्याने पालकांनी सुस्कारा सोडला आहे. येथील आगाराला गेल्या दोन दिवसात रोज सरासरी पाच लाखांचे उत्पन्न मिळाले.

शासनात विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा आक्टोबरपासून संप सुरू होता. त्यामुळे लालपरीची सेवा ठप्प होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी सुमारे ३० टक्के कर्मचारी कामावर हजर झाल्याने कोल्हापूर, संकेश्‍वर, पुणे, आजरा या मार्गावरील काही फेऱ्या सुरू झाल्या होत्या. पण, सर्वाधिक आवश्यकता असणाऱ्या ग्रामीण भागातील फेऱ्या ठप्प राहिल्याने त्या प्रवाशांची मोठी कुचबंणा झाली. एसटीच्या फेऱ्या नसल्याने विद्यार्थ्यांना वडापला आर्थिक भुर्दंड सोसून यावे लागत होते. महिन्याचे एसटी पासचे पैसे आठवड्याला खर्चावे लागले.
सोमवारी (ता. १८) उर्वरित एसटीचे कर्मचारी हजर झाले. त्यामुळे बहूतांशी मार्गावरील फेऱ्या पूर्ववत झाल्या.

आगाराच्या एकूण ३० मुक्कामाच्या फेऱ्या असून त्यापैकी २५ सुरू झाल्याचे आगारप्रमुख संजय चव्हाण यांनी सांगितले. या आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारा कोल्हापूर मार्गावर १२, संकेश्‍वर ६, गारगोटी, आजरा व नेसरी ३, पुणे ५ अशा गाड्या धावत आहेत. सोलापूर, पंढरपूरसह तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागात एसटी सुरू झाली आहे. आगाराकडे ६० बस असून १२९ वाहक, १४८ चालक तर कारागीर ६६ आहेत. सध्या दररोज पाच लाखांचे उत्पन्न मिळत आहे.


नाँन स्टॉप कोल्हापूरची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यात नॉन स्टॉपचा पॅटर्न सुरू करणारी कोल्हापूर नॉन स्टॉप फेरी प्रवाशांत कमालीची लोकप्रिय आहे. ‘वाट पाहिन..पण नॉन स्टॉपनेच जाईन’ अशीच प्रवाशांची मानसिकता आहे. वेळेची बचत हे त्यामागील प्रमुख कारण आहे. गेल्या दशकभरापासून सुरू असणारी फेरी कोरोना, संप यामुळे विस्कळीत झाली होती. ती पूर्वतत सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT