जयसिंगपूरमधून दुचाकी चोरीस
जयसिंगपूर : शहरातील तिसऱ्या गल्लीतील क्रांतीवीर कलगोंडा पाटील यांची वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना मंगळवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. तपास जयसिंगपूर पोलिस करत आहेत.
..........
धनादेश न वठल्याबद्दल शिक्षा
जयसिंगपूर : बनावट न वठणारा धनादेश दिल्याबद्दल भिमराव मधुकर कोरे (रा. तेरवाड ता. शिरोळ) यास सहा महिन्याची शिक्षा व २ लाख ५ हजार रुपये नुकसान भरपाई, ५ हजार दंडाची शिक्षा कुरुंदवाड प्रथमवर्ग न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी सुनावली. प्रल्हाद माळकरी यांच्यावतीने अॅड. हिदायत नदाफ (रा. उदगांव) यांनी काम पाहिले. प्रल्हाद सोपाना माळकरी (रा. तेरवाड) यांच्याकडून आरोपी भिमराव मधुकर कोरे याने शाळेचे अनुदान प्राप्त करुन आणण्यासाठी २०१३ मध्ये २ लाख ५० हजार रुपये घेतले होते. रकमेच्या परत फेडीसाठी म्हणून आरोपीने दि रत्नाकर बँक शाखा इनाम धामणी (ता. मिरज) यांचेच्याकडील १ लाख रुपयाचे २ धनादेश दिले होते. ते न वठल्याने प्रल्हाद माळकरी यांनी कुरुंदवाड न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.