कोल्हापूर

शिरोळ तालुका अव्वल

CD

शिरोळ तालुका ठेव संकलनात अव्वल
आरोग्य राज्यमंत्री पाटील; जिल्हा बँकेची नांदणी शाखा जिल्ह्यात पहिली
जयसिंगपूर, ता. २१ ः कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ठेवी संकलनाच्या उद्दिष्टात शिरोळ तालुका जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरला. ठेवी जमा करण्यामध्ये जिल्हा बँकेची नांदणी शाखा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आली. बँकेच्या तालुक्यामधील शाखांमधील अधिकारी-कर्मचारी, सभासद, ग्राहक, तसेच बँकेच्या व्यवसाय वृद्धीसाठी ज्यांनी सहकार्य केले ते सर्व कौतुकास पात्र आहेत, असे उद्‍गार जिल्हा बँकेचे संचालक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले.
यड्रावकर म्हणाले, ‘‘ठेव संकलनासाठी तालुक्याला ९१७ कोटी ५४ लाख ५४ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. अधिकारी, कर्मचारी व ठेवीदारांच्या सहकार्यामुळे मार्चअखेर ९५२ कोटी ५० लाख ०८ हजार रुपयांच्या ठेवी जमा केल्या. दिलेल्या उद्दिष्टाच्या १०४ टक्के ठेवींचे उद्दिष्ट तालुक्याने पूर्ण करताना उद्दिष्टापेक्षा ३४ कोटी ९५ लाख ५४ हजार रुपयांच्या जादा ठेवी मिळविल्या. वाढीव शेअर्ससाठी तालुक्याला १५० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. यातही तालुक्याने १६६ कोटी ६३ लाख वाढीव शेअर्स म्हणून संकलित केले आहेत. वाढीव शेअर्सपोटी १६ लाख ६३ हजार जमा झाले.’’
जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आणि संचालकांच्या सहकार्याने जिल्हा बँकेचा कारभार महाराष्ट्रात आदर्शवत झाला आहे. बँकेकडे हजारो कोटींच्या ठेवी सध्या जमा असून जिल्हा सहकारी बँक जिल्ह्याची शिखर बँक म्हणून प्रगतिपथावर आहे, असेही यड्रावकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT