कोल्हापूर

शासकीय उद्यानात फुलांचा बहार

CD

12307

शासकीय बागा बहरल्या;
मनपा बागा कोमेजल्या!

मोहन मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर ता. ८ :  कोल्हापूरला बागांचे शहर म्हटले जायचे.  ५४  हुन अधिक  बागा  महापालिका क्षेत्रात आहेत. १२० हुन अधिक कर्मचारी आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टाऊन हॉल उद्यान,  प्रिन्स शिवाजी गार्डन आणि सर्किट हाऊसची बाग म्हणजे हिरवाई आणि रंगीबेरंगी पानाफुलांची बहार आहे. आणि महापालिकेच्या सर्वच बागा म्हणजे  सुकलेली झाडे, मोडकी तुटकी  खेळणी, कारंजे, ओसाड लॉन असे चित्र आहे. केवळ तीन निवृत्त कर्मचाऱ्यांनी फुलवलेल्या शासकीय बागा चर्चेचा विषय होत आहेत.  
महापालिकेची रंकाळा चौपाटी म्हणजे पर्यटक आणि करवीरवासीयांसाठी रमणीय ठिकाण. हुतात्मा पार्क लॉन मुलांन मैदानाच होते. महावीर गार्डनमधील खेळणी आणि मत्स्यालयाचे आकर्षण होते.  काही वर्षांपूर्वी रंकाळा पदपथ उद्यान आणि महावीर गार्डनसध्ये खेळण्यातील रेल्वेपण  बसविण्याल्या होत्या.,सासने उद्यानात ट्रॅफिक गार्डन तयार केली होते. कसबा बावडा हनुमान तलाव चौपाटी तर मिनी रंकाळा चौपाटी होते. परंतु सध्या चांगल्या बागांची दुर्दशा झाली आहे.
शंभरहून अधिक कर्मचारी आणि पुरेसे पाणी असताना या बागांमधील झाडे सुकतातच कशी हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे शहराच्या मध्यवस्तीत असलेले प्रिन्स शिवाजी गार्डन, टाऊन हॉल उद्यान आणि सर्किट हाऊस या शासकीय बागा मात्र नागरिकांना आकर्षित करून घेत आहेत.या उद्यानाचे माळी सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले आहेत. परंतु त्यांची कामावरील श्रद्धा पाहून तत्कालीन उद्यान अधीक्षक विजय रावळ (सध्या बदली मुंबई) यांनी तिघांनाही तीन बागांच्या देखभालीचा अघोषित ठेकाच  दिला. आणि या तीनही लोकांनी त्याला सार्थ न्याय दिला. २०१४ मध्ये निवृत्त झालेले पांडुरंग चौगुले यांच्या देखरेखीखाली प्रिन्स शिवाजी गार्डन बहरलेली दिसत. सर्किट हाउसच्या बागेसाठी सुरेश चौगुले  आणि टाऊन हॉल उद्यानामध्ये रंगराव शिंगाडे सहकाऱ्यांसोबत मेहनत घेत आहेत.  टाऊन हॉल उद्यान तर मॉर्निंग वॉकरचा ट्रेक झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT