कोल्हापूर

संजय गांधी योजना

CD

‘संगायो’चे अडीच कोटींचे
अनुदान लाभार्थ्यांना मिळणार
गडहिंग्लजला नऊ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : संजय गांधी निराधार योजना समितीअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या तालुक्यातील नऊ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना जानेवारी ते मार्चअखेरचे दोन कोटी ६४ लाखांचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले. उद्यापासून ही रक्कम लाभार्थ्यांना मिळणार आहेत.
अध्यक्ष अमर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली योजना समितीची बैठक झाली. तहसीलदार दिनेश पारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विधवा, अपंग, परितक्त्या, अविवाहितचे १०४ प्रस्ताव होते. त्यातील ७० प्रस्तावांना मंजुरी दिली असून, १० प्रस्ताव फेर चौकशीसाठी पाठविले. २४ प्रस्ताव अपात्र ठरविले. श्रावणबाळ योजनेचे ६२ पैकी ४९ प्रस्ताव मंजूर केले. फेर चौकशीसाठी चार प्रस्ताव पाठविले असून, उर्वरित प्रस्ताव नामंजूर केले. एकूण ११९ पैकी १४ प्रस्ताव फेरचौकशीसाठी, तर २७ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत.
जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्याचे लाभार्थ्यांचे अनुदान २ कोटी ६४ लाख ३१ हजार रुपये जवळच्या केडीसीसी बँकेच्या शाखांमध्ये जमा करण्यात आले आहे. सोमवारपासून (ता. ४) या रक्कमेचे वाटप लाभार्थ्यांना सुरू झाले. बैठकीस समितीचे सदस्य हारुण सय्यद, सचिन देसाई, ज्योत्स्ना पताडे, रोहिणी भंडारी, बाळेश नाईक, रमजान अत्तार, सचिव तथा तहसीलदार दिनेश पारगे, अव्वल कारकून विकास कोलते, जावेद बागवान, नायब तहसीलदार राजेंद्र यादव, महसूल कर्मचारी लखन खाडे, रोनाल्ड गोम्स उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! महाराष्ट्रात राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गुप्त बैठक?

Vijay Thalapathy Video Karnataka : मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत कर्नाटकातील टोलनाक्यावर घडली अचंबित घटना, देवदर्शनासाठी जाताना कार स्वतः चालवली

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा वाद मिटणार? माजी मंत्र्यांनी सुचवला 'हा' 45 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक तोडगा, नागनाथअण्णांनी असं काय केलं होतं?

Simcard Safety : मोबाईलचं नेटवर्क अचानक गायब होतंय का? हॅक झालेलं असू शकतंय तुमचं सिमकार्ड, 'या' ट्रिकने लगेच करा चेक

Latest Marathi News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपात गोंधळ; टोकन न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT