कोल्हापूर

हत्तींना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

CD

कोलीक हद्दीतील खिंड बंद करा
आमदार पाटील; हत्तींच्या कर्नाटकातून येणाऱ्या मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ ः चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागात वन्य प्राण्यांच्या त्रासाने शेतकरी हैराण झाले आहेत. यासंदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, कर्नाटकातील हत्ती कोलीक (ता. चंदगड) येथील खिंडीतून महाराष्ट्रात प्रवेश करतात. ही खिंड बंद केल्यास त्यांचा प्रवेश रोखला जाईल. गवे व इतर प्राण्यांकडून होणारे नुकसान आणि भरपाई वाढवून मिळणे यासह विविध मुद्यांकडे या निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.
हत्तींना रोखण्यासाठी वन विभागाने जागोजागी चर खोदाई केली आहे. परंतु हत्ती हा हुशार प्राणी असल्याने त्याने ते बुजवून किंवा अन्य पर्यायी मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करीत आहेत. मनुष्यवस्ती तसेच पिकांची नासधूस करीत आहेत. यासंदर्भात खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांनी वन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बैठकीत दक्षिणेकडील राज्यामध्ये हत्तींना कशा प्रकारे अटकाव केला जातो याची चित्रफीत दाखवण्यात आली होती. या पध्दतीचा अवलंब करुन कोलीक (ता. चंदगड) येथे जंगलातील खिंडीवर प्रतिबंध करून कर्नाटकातून येणाऱ्या हत्तींना अटकाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांकडून केल्या जाणाऱ्या नुकसानीबाबतसुध्दा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने भरपाई वाढवून मिळावी यासाठी शासनाला अहवाल सादर केला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. ज्या पिकासाठी कर्ज घेतले जाते ते पिकच उद्‍ध्वस्त होत असल्याने कर्ज परतफेड करायची कशी, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. त्यामुळे या सर्वच बाबींकडे गांभीर्याने पाहून शासन स्तरावर निर्णय घेतले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT