कोल्हापूर

जिज्ञासा

CD

13322
कोल्हापूर : स्पेशल ऑलिंपिक्स भारततर्फे आयोजित वर्ल्ड रेकॉर्ड प्रयत्नामध्ये सहभागी झालेले ६० गतिमंद खेळाडू.

स्पेशल ॲथलेटिक्समध्ये
६० गतिमंद मुलांचा सहभाग
कोल्हापूर, ता. ७ : ​" भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष "अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्पेशल ऑलिंपिक्स गतिमंद मुलांच्या ॲथलेटिक्सचे आयोजन केले होते. यात जिज्ञासा विकास मंदिर येथे शहरातील ६० गतिमंद मुलांनी सहभाग घेत कवायतीचे विविध प्रकार करत सहभाग नोंदवला. तसेच ''हेल्थ फिस्ट'' आरोग्य तपासणी शिबिरात मुलांची आरोग्य तपासणी केली. स्पेशल ऑलिंपिक्स भारत ही संस्था बौद्धिक अक्षम मुलांसाठी विविध खेळांचे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजन करून बौद्धिक अक्षम मुलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. संघटनेतर्फे आरोग्य तपासणी शिबिरात देशभरातील ७५ शहरांत ७५ हजार गतिमंद ॲथलेट्स सहभागी झाले. महाराष्ट्र शाखेतर्फे ३ हजार ४०० विद्यार्थी व कोल्हापूर विभागात ४०१ विद्यार्थी सहभागी झाले होते. याचबरोबर स्पेशल ऑलिंपिक्स भारत, स्पॉट जॉगिंगच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न केला. यासाठी भारतात ५८०० स्पेशल ॲथलेट्‍सची नोंदणी झाली. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, चेतन पाटील, खेळाडू गिरीजा बोडेकर, सचिन पाटील, स्पेशल ऑलिंफिक्स भारत कोल्हापूर विभाग अध्यक्षा स्मिता दीक्षित, विशाल दीक्षित आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT