कोल्हापूर

सांस्कृतिक कोल्हापूर

CD

फोटो येत आहे.

‘ये दिल तुम बिन कही..‘
रंगली अवीट गीतांची मैफल

कोल्हापूर, ता. ८ ः स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ३२ भाषांमधून ३० हजारांहून अधिक गीते गायिली. सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यांच्या अशाच गीतांची ‘ये दिल तुम बिन कही..’ मैफल शाहू स्मारक भवनात रंगली. हृदयस्पर्श सोशल ॲण्ड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने मैफलीचे आयोजन झाले. भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, डॉ. सतीश पत्की, अरुण गाठ, अजित पाटील, वसंत घाटगे आदींच्या उपस्थितीत मैफलीला प्रारंभ झाला.
तब्बल साडेतीन तासांच्या कार्यक्रमात मराठी- हिंदी सिनेमांतील ३६ अभिनेत्रींवर चित्रित झालेली गीते एलईडी स्क्रीनवर सादर झाली. लतादीदींनी गायिलेल्या गीतांमध्ये त्यांनी ‘आनंदघन'' या नावाने संगीत दिलेली गीते, फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळालेली गीते, कॅब्रे गीते, बंगाली आणि एकमेव गायलेल्या इंग्लिश गीताचा त्यामध्ये समावेश होता. लतादीदींच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचा खडतर ते मखमली हा जीवनप्रवास पद्मिनी कापसे यांनी मांडला. संकल्पना आणि निर्मिती पद्माकर कापसे यांची होती.
............
13504

‘शब्दांची रोजनिशी‘
नाटकाचा उद्या प्रयोग

कोल्हापूर, ता. ८ ः येथील प्रत्यय नाट्य संस्था, दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवारी (ता.१०) ‘शब्दांची रोजनिशी‘ नाटक होणार आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी साडेपाच आणि आठ वाजता प्रयोग होतील.
रामू रामनाथन लिखित व अतुल पेठे दिग्दर्शित ''शब्दांची रोजनिशी'' हे प्रायोगिक नाटक भाषेच्या अवनतीकडे तसेच त्यातील राजकारणावर भेदक भाष्य करते. नाटक अमर देवगावकर यांनी भाषांतरीत केले असून, रंगावृत्ती आणि प्रकाशयोजना अतुल पेठे यांनी केली आहे. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत साकेत कानेटकर, आदिवासी संगीत प्राची दुबळे (वैद्य), वेशभूषा रश्मी रोडे यांची आहे. ॲनिमेशन शुभंकर सौन्दणकर आणि सावनी पुराणिक यांनी केलेले आहे. यज्ञेश आंबेकर, सागर डहाळे, आदित्य संतोष आणि शुभम परखड रंगमंच व्यवस्था सांभाळत आहेत. केतकी थत्ते आणि अतुल पेठे हे दोघे कलावंत मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT