कोल्हापूर

प्रदूषणामुळे पंचगंगेची परिस्थितीकी धोक्यात

CD

प्रदूषण फोटो

पंचगंगेची ‘इकॉलॉजी’ धोक्यात
---
प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती घटल्या; मानवी आरोग्यासही धोका
ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने नदीची ‘इकॉलॉजी’ (परिस्थितीकी) धोक्यात आली आहे. त्याचा परिणाम नदीतील सजीव घटकांवर तर झालाच, पण मानवी आरोग्यही धोक्यात आले. पंचगंगेतील माशांच्या अनेक प्रजाती दुर्मिळ होत आहेत. प्रदूषण असेच वाढत राहिले तर नदीची ‘इकॉलॉजी’ अत्यंत खराब होईल. ती लवकर सुधारता येणार नाही.
नदी कोणतीही असो, तिची स्वतःची ‘इकॉलॉजी’ असते. ती नैसर्गिक असून, ती एका अर्थाने नदीचे आरोग्य सांभाळते. यावरच नदीतील जैवविविधता अवलंबून असते. नदीतील मासे, पाणवनस्पती, अन्य जलचर यांचे अस्तित्व ‘इकॉलॉजी’वर अवलंबून असते. प्रदूषणामुळे ‘इकॉलॉजी’ धोक्यात येते. ही ‘इकॉलॉजी’ आपण दुरुस्त करू शकत नाही. त्याची एक नैसर्गिक प्रक्रिया असून, त्यासाठी बरीच वर्षे लागतात. सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने नदीच्या पाण्यातील नैसर्गिक प्राणवायू व अन्य घटकांचे संतुलन बिघडते. त्यामुळे नदीच्या ‘इकॉलॉजी’चा भाग असणाऱ्या घटकांच्या वाढीवर परिणाम होतो. नदीत जलपर्णी अधिक गतीने वाढते. शेवाळ वाढते. काही वेळा पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे (डिझॉल ऑक्सिजन) प्रमाण कमी होते. त्यामुळे काही जलचर स्थलांतर करतात; तर काही मृत होतात. ‘इकॉलॉजी’मधील काही घटकांची अनियंत्रित वाढ होते, हे संतुलनाच्या दृष्टीने घातक आहे. नदीची ‘इकॉलॉजी’ धोक्यात आल्यावर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावरही होतो. दूषित पाणी पोटात गेल्या १६ प्रकारचे विकार उद्‍भवतात. यात काविळीसारखे दुर्धर आजारही आहेत. तसेच, त्वचाविकारही होतात. नदीची ‘इकॉलॉजी’ बिघडल्याचे परिणाम एका दिवसात दिसत नाहीत. त्यासाठी वर्षानुवर्षे जावी लागतात. त्यानंतर हे परिणाम दिसू लागतात. आज पंचगंगा याच वाटेवर उभी आहे. नदीतील माशांच्या प्रजाती कमी झाल्या आहेत. नदीच्या काही भागात वारंवार जलपर्णी उद्‍भल्याचे दिसते. काही ठिकाणी पाण्याला काळा रंग आला आहे. नदीतील पाणी थेट पिण्याच्या योग्यतेचे नाही.


नदीची ‘इकॉलॉजी’ ही नैसर्गिक असून, नदीच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ही ‘इकॉलॉजी’ बिघडल्यास त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होतात. तसेच, ही परिस्थिती बिघडल्यास ती सुधारण्यास वर्षानुवर्षे लागतात. यासाठी प्रदूषणमुक्त नदी असणे ही काळाची गरज आहे.
- उदय गायकवाड, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

------------
नदीत पूर्वी असणाऱ्या खवले, कोळशी, आळकूट टाकरी, घोगरा शोंगाळा या प्रजाती दुर्मिळ झाल्या आहेत. सध्या दिसणाऱ्या कटला, रोहा, निरगल, ग्रासकार्क या तलावात तयार होणाऱ्या माशांच्या जाती नदीत आढळतात. नदी प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
- प्रा. एकनाथ काटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन

Jackie Shroff moves HC : 'भिडू' शब्द वापरायचाय? आधी माझी परवानगी घ्या.. जग्गू दादाची दिल्ली हायकोर्टात धाव

Marathi News Live Update: भावेश भिंडेला फरार घोषित करा; मुंबई होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्यांची मागणी

"तरच सलमानला माफ करू"; सलमानला माफ करण्यासाठी बिश्नोई समाजाने ठेवली 'ही' अट

Breast Cancer: 'या' 5 गोष्टी केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका होऊ शकतो कमी

SCROLL FOR NEXT