कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात भारी

CD

14050
श्रृंगारवाडी (ता. आजरा) : बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कारात श्रुंगारवाडी ग्रामपंचायत अव्वल ठरल्याची माहिती समजताच रविवारी येथे श्रुंगारवाडी व उचंगी गावात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

कोल्हापूर जिल्हा परिषद
राज्यात भारी
५० लाखांचा राष्ट्रीय पुरस्कार; ‘बालसुलभ’ मध्ये श्रुंगारवाडी अव्वल
कोल्हापूर, ता. १० ः राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात भारी ठरली. बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कारात जिल्ह्यातील श्रृंगारवाडी (ता. आजरा) ग्रामपंचायत अव्वल ठरली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२ (पडताळणी वर्ष २०२०-२१) करिता सर्व उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली असून, पंचायत समिती पुरस्कारामध्ये राहता (जि.नगर) आणि मालवण (जि.सिंधुदुर्ग) पंचायत समितीची निवड झाली आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात १७ ग्रामपंचायती समावेश झाला आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार नगरच्या लोहगाव ग्रामपंचायतीला मिळाला. नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार भंडारवाडी (जि. उस्मानाबाद) ग्रामपंचायतीला मिळाल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारअंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये तर राहता व मालवण पंचायत समितींना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि १७ ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरूपात थेट खात्यात जमा होईल. श्रृंगारवाडी आणि लोहगार ग्रामपंचायतीस प्रत्येकी पाच लाख रुपये थेट मिळतील.
पंचायत राज दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे कोणत्याही एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला हजर राहून पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीच्या कार्यास प्रोत्साहन देणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. त्यांनी पुरसकारप्राप्त सर्व पदाधिकारी-अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
चौकट
पुरस्कारप्राप्त १७ ग्रामपंचायती अशा
मोदाळे (ता. इगतपुरी, जि. नाशिक), लोहगाव व लोणी बुद्रुक (ता. राहता, जि.नगर), कोतावडे व शिरगाव (ता. कडेगाव, जि. सांगली), वाघोली (ता. मोर्शी, जि.अमरावती), बावी (कौल) (ता. जि. उस्मानाबाद), धारुर (ता. जि. उस्मानाबाद), दरी (ता. जि. नाशिक), नेरी (ता. मोहाडी, जि. भंडारा), श्रृंगारवाडी (ता.आजरा, जि.कोल्हापूर), नन्व्हा (ता. सालेकसा, जि. गोंदिया), धोरोशी (ता. पाटण, जि. सातारा), झरी (ता. लोहा, जि. नांदेड), आरे (ता. गुहागर, जि. रत्नागिरी), मुठेवडगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि खानापूर (ता.जि.उस्मानाबाद).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभवबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, तुम्ही कोणत्याही मुलाला...

Video: 'असा' रचला केतनच्या खुनाचा कट; सिया अन् चेतनचा कॅफेतला व्हिडीओ आला, हातात हात देऊन बसले अन् केलं प्लॅनिंग

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

SCROLL FOR NEXT