कोल्हापूर

अडकूर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा

CD

14427
अडकूर ः सरपंच यशोदा कांबळे व उपसरपंच अनिल कांबळे यांच्याकडे मागणीचे निवेदन देताना ग्रामस्थ.

अडकूर ग्रामपंचायतीवर मोर्चा
रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या मुद्यावर ग्रामस्थ आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १२ ः अडकूर (ता. चंदगड) येथील पाटील गल्लीतील रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याच्या मुद्यावरून आक्रमक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. सरपंच यशोदा कांबळे, उपसरपंच अनिल कांबळे यांच्यासमोर त्यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. वित्त आयोगाच्या निधीतून या रस्त्याचे काम करून घेतले जाईल, असे आश्‍वासन सरपंच व उपसरपंचांनी दिले.
गावच्या नळपाणी योजनेसाठी पाटील गल्लीतील रस्ता दोन वर्षांपूर्वी खोदण्यात आला. पाईप लाईन टाकल्यावर पुन्हा रस्ता केला जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मधोमध रस्त्याची खोदाई केल्यामुळे ग्रामस्थांना रहदारीला त्रास होत होता. दिव्यांग बांधवांना चालताना तर खूपच कसरत करावी लागत होती. या प्रश्‍नावर आक्रमक झालेल्या नागरिकांनी आज तडक ग्रामपंचायत कार्यालय गाठले. त्यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांपैकी कोणीही हजर नव्हते. काही वेळाने सरपंच व उपसरपंच उपस्थित झाले. यावेळी नागरिकांनी त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल प्रश्न केले. पंधरा दिवसांच्या आत हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी केली. त्यावर सरपंच यशोदा कांबळे, उपसरपंच अनिल कांबळे यांनी वित्त आयोगाच्या निधीतून खर्चाची तजवीज करून हा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महेश देसाई, नंदकुमार गार्डेकर, संजय देसाई, संदीप देसाई, बशीर जमादार, संजीवनी देसाई, सुरेखा देसाई, वैशाली देसाई, अनिता देसाई, अनिता सावर्डेकर, सुमन देसाई, संयोगिता देसाई, शीतल देसाई, उज्वला देसाई, प्रियांका ऐतवडेकर, विमल डेगवेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT