कोल्हापूर

एकशे तीस कलाकारांचा कलाविष्कार

CD

17353
-शाहू कृतज्ञता पर्व लोगो
--
विविध कलाविष्काराने शाहूंना मानवंदना

शाहू मिलमध्ये १३० चित्रकार-शिल्पकारांनी एकाचवेळी साकारल्या कला

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता १३० हून अधिक चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना मानवंदना दिली. शाहू मिल परिसरात मोठ्या हॉलमध्ये एकाच छताखाली हे सर्व कलाकार एकत्र आले. कधी काळी छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबूराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना महाराजांनी राजाश्रय दिला. या मातब्बर कलाकारांनी कलासाधना करून ‘कोल्हापूर स्कूल’ अशी एक स्वतंत्र शैली निर्माण केली.
या कलेचा जागर अखंडित ठेवण्याच्या उद्देशाने हे सर्व कलाकार शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी ऐतिहासिक शाहू मिलमध्ये एकत्र आले होते.
या उपक्रमाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रवीण गायकवाड , शिरीष बिवलकर आदी उपस्थित होते. नागरिकांना ही प्रात्यक्षिके ४ दिवस पाहता येतील. या उपक्रमासाठी कॅमल कंपनीने सहकार्य केले असून, सर्व कलाकारांना कॅनव्हास व रंग कॅमलने मोफत उपलब्ध करून दिले आहे. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कला निकेतन कला महाविद्यालय, कलामंदिर कला महाविद्यालय, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, रंगबहार, कलासाधना यांच्यासह परिसरातील इतर चित्रकार, शिल्पकार आदींच्या उत्स्फूर्त सहभागातून हा उपक्रम झाला.
कलाविष्काराच्या उपक्रमानंतर नागरिकांसाठी या चित्रांचे प्रदर्शन, ‘कृतज्ञता पर्वात’ शाहू मिल परिसरात होणार आहे.
याप्रसंगी नंदकुमार गायकवाड, जयप्रकाश ताजणे, दिलीप घेवारी, सिद्धार्थ लांडगे, रंजित चौगुले, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT