कोल्हापूर

वाहतूक नियंत्रण विभागाविरोधात आंदोलन

CD

17303

वाहतूक नियंत्रण विभागाच्या
कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन

चुकीच्या फलकांकडे ‘एआयएसएफ’ने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः महापालिका आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने शिवाजी रोडच्या रस्त्याच्या दुतर्फा चुकीच्या पद्धतीचे आणि वाहतूकदारांची दिशाभूल करणारे फलक लावले आहेत. चुकीच्या फलकामुळे बाहेरगावचे प्रवासी चुकीच्या ठिकाणी वाहने पार्किंग करतात आणि त्यांच्याकडून वाहतूक नियंत्रण विभाग दंड वसूल करतो. या भोंगळ कारभाराविरोधात आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने वाहनांचे ठिय्या आंदोलन केले.
फेडरेशन, महाराष्ट्राचे राज्यसचिव प्रशांत आंबी म्हणाले, ‘‘अठरा एप्रिलला चुकीच्या फलकांना हार घालून उपहासात्मक आंदोलन झाले. दुसऱ्या दिवशीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फलक बदलला. मात्र, त्यातही चुका होत्या आणि दंडाची कारवाई काही थांबत नव्हती. वारंवार सांगूनही वाहतूक पोलिस दखल घेत नव्हते. एकाच कामात तीन तीन वेळा हे अधिकारी चुकत असतील, तर ही खरंच गंभीर गोष्ट आहे. जर अधिकाऱ्यांना आणि फलक लावणाऱ्यांना सम-विषम पार्किंग कळत नसेल तर सामान्य माणसांना कसं कळणार? त्यामुळे हे फलक जोपर्यंत बदलले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.’’ ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष हरिष कांबळे यांनी वाहतूकदारांची अन्यायी लूट थांबली पाहिजे, असे सांगितले. यावेळी आरती रेडेकर, कृष्णा पानसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाचे संकेत; राज्यात पावसाचा अलर्ट, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

New Zealand T20I Squad Update: सलग दोन पराभव अन् न्यूझीलंड संघात उलथापालथ; भारताला हरवण्यासाठी धडाधड निर्णय

Beed Crime : बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून १० लाखांची खंडणी; ७ जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल

Parner Crime : पारनेर-सुपे परिसर दहशतीखाली ठेवणाऱ्या भोसले टोळीवर मोक्का! 11 सराईत गुन्हेगारांवर कारवाई

Kojagiri Purnima Special: कोजागिरी पौर्णिमेसाठी खास; बनवा टेस्टी अन् पौष्टिक 'मसाला दूध'!

SCROLL FOR NEXT