कोल्हापूर

पावसाने झोडपून

CD

जिल्ह्याला वळवाने झोडपले

कोल्हापूर, ता.२४ : जिल्ह्यात काल रात्री ठिक-ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वळीव पावसाने झोडपून काढले. कागल, आजरा, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी तालुक्‍यासह कोल्हापूर शहरातही या पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत खांबावरील वीज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुपारपर्यंत त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. कागल, राधानगरी, आजरा, हातकणंगले तालुक्‍यात जोरदार वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, तर मोठ-मोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे शहरातील संभाजीरनगर, रामानंदनगर, रंकाळ परिसरात, साने गुरुजी वसाहत परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. करवीर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात ढगांचा गडगडाट जाणवला व वारेही वाहिले, पण तुरळक पावसाने हजेरी लावली.
* पावसाचा अंदाज
जिल्ह्यात आणखी दोन दिवस दरम्यान विजांचा कडकडाट, जोराचा वाऱ्यासह ठिक-ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आकाशात विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहून नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाकडून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

RCB vs SRH: विराटची भर मैदानात ईशान किशनसोबत थट्टा, हनवटीला धरून गोंजारलं; Video Viral

डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

SCROLL FOR NEXT