१७३५७,५८
शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत
के.एम. चषक फुटबॉल स्पर्धा; बालगोपालवर विजय
कोल्हापूर, ता. २४ : शिवाजी तरुण मंडळने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत के.एम. फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध झालेल्या सामन्यात शिवाजी मंडळने २ - ० ने विजय मिळवत साखळी फेरीत दोन सामन्यांत ६ गुणांची कमाई केली. झुंजार क्लब आयोजित के.एम. चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या मंडळ विरुद्ध बालगोपाल सामना एकतर्फी झाला. सामन्याच्या पूर्वार्धात मंडळकडून आक्रमक खेळ झाला. दरम्यान, बालगोपालच्या बचावफळीने अचानक प्रतिआक्रमण करत गोलजाळी भेदण्याचा प्रयत्न केला मात्र, फुटबॉल गोलखांबावर आदळून बाहेर गेला. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला मंडळच्या योगेश कदमने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात बालगोपालने आक्रमक चाली करत मंडळ समोर आव्हान निर्माण केले. यामध्ये रोहित कुरणे, अभिनव साळोखे, ऋतुराज पाटील यांनी चांगला खेळ केला. निर्धारित वेळेनंतर अधिकच्या वेळेत मंडळाच्या संकेत साळोखेने आणखीन एक गोल करत संघाला २ - ० असा विजय मिळवून दिला. या विजयासह साखळी फेरीत सर्वाधिक गुण कमावत मंडळने अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. योगेश कदमला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
आजचा सामना
दुपारी ४ वाजता दिलबहार तालीम मंडळ वि. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.