कोल्हापूर

चिमण्याची घरटी रंगवा स्पर्धा

CD

17368

कलेतून निसर्ग संवर्धनाकडे उपक्रमाला प्रतिसाद
चिमणीच्या घरट्यांवर अनोखी चित्रकला स्पर्धा
कोल्हापूर, ता. २४ ः "कलेतून निसर्ग संवर्धनाकडे" असा निसर्गपूरक संदेश देत आज झालेल्या चिमणीच्या घरट्यांवरील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका, अमूज क्राफ्ट, वर्ल्ड फॉर नेचर , खोपा बर्डस हाऊस, फ्लेक्जोग्राफ , वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि आभाळमाया फाउंडेशनच्या सहकार्याने वसुंधरा दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा झाली.
महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर यांनी निसर्ग व पशु- पक्षी संवर्धनासाठी उपयुक्त माहिती स्पर्धकांना दिली. स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना महावीर गार्डनमधील सर्व झाडांची उपयुक्त माहितीही त्यांनी सांगितली. विद्यार्थी दशेत सर्वांनी निसर्गमूल्ये शिकावीत व त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करावा, असे आवाहन व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी केले. स्पर्धेत पाचशेहून अधिक स्पर्धकांनी चिमण्यांची घरटी रंगवली. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा व कोल्हापूर शहरात प्रथमच अशी अनोखी स्पर्धा घेण्यात आली. खोपा बर्ड हाऊसच्या सचिन शिंगारे यांनी घरट्यांबाबत मार्गदर्शन केले. वर्ल्ड फॉर नेचरच्या अभिजीत वाघमोडे यांनी चिमण्या वाचविण्यासाठीचे उपाय सांगितले. मंगेश ओतारी, अमृता ओतारी, जोतीराम चव्हाण, ओंकार चव्हाण, प्रियांका कदम, अनिल धडाम, सुशांत वाघमोडे, मानसी घोरपडे आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC घोटाळा उघड करणार असल्यानं मला निलंबित केलं, आरोग्य उपसंचालिका गायकवाड यांचे खळबळजनक आरोप

सैफ अली खान इन्स्टाग्रामवर आला अन् सर्वप्रथम करीनालाच फॉलो केलं; पहिल्या पोस्टमध्ये असं काय की, लोक करताय चर्चा

Rohit Sharma MI Captain: रोहित खरंच, Mumbai Indians चा कर्णधार होणार का? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Maharashtra Live News : सोलापूर शहरावरील पाणी कपातीचे संकट टळलं, शहरातील पाणीपुरवठा राहणार सुरळीत..

Rahuri News: पतीचा दवाखाना सुरू करायला २० लाख माहेरून आण, डॉक्टर महिलेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT