

Rekha Gaikwad
esakal
MPSC Scam: लातूर येथील आरोग्य उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर रेखा गायकवाड यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळातील विविध कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या शहरी आरोग्यसेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियानाचे संचालक डॉक्टर सुनील भोकरे यांनी दिले होते. या चौकशीसाठी दोन वेळा समितीही बदलण्यात आली. चौकशीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने डॉक्टर गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.