कोल्हापूर

संगीत मैफल

CD

17374
कोल्हापूर ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त रविवारी गुणीदास फाउंडेशन, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग आणि गायन समाज देवल क्लब यांच्या वतीने संगीत दरबार कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना संजयसिंह चव्हाण.

सुमधूर गीतांनी सजली
संगीत दरबार मैफल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः पियानो वादक सावनी धर्माधिकारी यांनी जादुई बोटाद्वारे वाजवलेले सुरेल पियानो, ज्येष्ठ गायक पंडित विनोद डिग्रजकर यांनी केलेले शास्त्रीय गायन, तसेच गायलेला अभंग ‘अबिर गुलाल’ तर ज्येष्ठ गायिका शीतल धर्माधिकारी यांनी गायलेली नाट्यपदे तर गायिका स्मिता घोसरवाडकर यांच्या सुरेल स्वर साजातून उमटलेल्या सुमधूर गीतांतून आज ‘संगीत दरबार’ ही संगीत मैफल आज रसिकांना ऊर्जा देऊन गेली.
गुणीदास फौंडेशन, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, गायन समाज देवल क्लबतर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त ‘संगीत दरबार स्वरांजली लोकराजाला’ ही संगीत मैफल ऐतिहासिक भवानी मंडपात झाली. यात शास्त्रीय गायन, वाद्य संगीत व सुगम संगीत सादर झाले.
या मैफलीच्या सुरवातीलाच सावनी धर्माधिकारी यांनी हिंदी, मराठी व इंग्रजी चित्रपटातील विविध धून पियानोद्वारे वाजवत मैफलीत रंगत भरली. वरद भोसले यांनी सतारवादन केले. त्यानंतर पंडित डिग्रजकर, शीतल धर्माधिकारी यांनी गायलेली नाट्यपदे, तसेच सावनी शिखरे व स्मिता घोसरवाडकर यांनी केलेले शास्त्रीय व सुगम गायनाने ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. आशय कुलकर्णी (तबला), अमित साळोखे (हार्मोर्नियम), प्रदीप जिरगे (कीबोर्ड), अभिषेक पुरोहीत, स्वानंद जाधव यांनी साथसंगत केली, तर महेश्वरी गोखले यांनी निवेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT