कोल्हापूर

बैलगाडा शर्यत

CD

(बैलगाडी शर्यतीचा संग्रहित फोटो वापरणे)

बैलगाडी शर्यती परवानगीविनाच
उरूस, जत्रा- यात्रांच्‍या निमित्ताने धुरळा; जाचक अटी, शर्थीचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळाली; पण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उरूस, यात्रा- जत्रांच्या निमित्ताने सुरू असलेल्या बैलगाडी शर्यतींना अपवाद परवानगीच घेतली जात नसल्याचे पुढे आले आहे. करवीरसह अन्य तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या बैलगाडी शर्यतींना परवानगीच मागितली नसल्याचे वास्तव आहे.
शर्यतीवेळी बैलांना दारू पाजणे, शॉक देणे, माराहाण करणे यामुळे बैलांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पुढे करून प्राणीप्रेमी संघटनेच्या वतीने बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. याची दखल घेऊन न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. तब्बल सहा वर्षांनी गेल्यावर्षी ही बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. ही बंदी उठवताना न्यायालयाने काही अटी व शर्ती घातल्या होत्या. त्यात बैलांना माराहाण करायची नाही, शॉक द्यायचे नाही, शर्यतीचा मार्ग हा एक किलोमीटर अंतराचाच राहील या अटींचा समावेश होता. त्याशिवाय या शर्यतींना सक्षम अधिकाऱ्यांची परवानगीही घेण्याची अट होती. शर्यतीपूर्वी बैलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असेही न्यायालयाने म्हटले होते. या सर्व अटीच शर्यतीला परवानगी घेण्यात मुख्य अडथळा ठरत आहे. परिणामी परवानगी न घेताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बैलगाडी शर्यतींचा धुरळा उडत आहे.
जिल्ह्यात न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यात प्रांताधिकाऱ्यांना परवानगीचे अधिकार दिले. काही गावांतून त्यासाठी परवानगीचे अर्जही आले होते; पण प्रांताधिकाऱ्यांनी ते नाकारूनही काही गावांत शर्यतीचे आयोजन नियमबाह्य होत आहे. जिल्ह्यात राजेंद्रनगर, नागाव, उचगांव, कळंबा तलाव, कसबा बावडा, भोसलेवाडी आदी ठिकाणची मैदाने यापूर्वी गाजलेली आहेत. आता या परिसरात पूर्वी ज्याठिकाणी बैलगाडी शर्यत व्हायची त्याठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. काही ठिकाणी नागरी वस्ती असल्याने मैदाने बंद झाली आहेत; पण तरीही डांबरी रस्त्यावर किलोमीटरची कोणतीही अट न पाळता या शर्यती तर होतातच; पण बैलगाडी मागे दुचाकी लावणे, बैलांना पंच कमिटीची नजर चुकवून माराहाण करणे, शॉक देणे असे प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे.

चौकट
कारवाई नाही
वर्षभरापासून बैलगाडी शर्यती सुरू आहेत. काही गावांनी यासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात आली, तर काहींनी नियम व अटीचे झेंझट नको म्हणून परवानगी न घेताच शर्यती घेतल्या; पण जिल्ह्यात नियमबाह्य शर्यती घेतल्या म्हणून आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT