कोल्हापूर

२० लाख ८० हजाराची फसवणूक बातमी

CD

परताव्याच्या बहाण्याने
वीस लाखांची फसवणूक
प्लॉटचे खोटे खरेदीपत्र बनवले; जुना बुधवार पेठेतील दोघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिक परतावा मिळवून देतो, असे सांगून सुमारे २० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी नीलेश रामकुमार पाटील, पूर्वा रामकुमार पाटील (दोघे रा. २७८४, सी वॉर्ड, ढिसाळ गल्ली, जुना बुधवार पेठ) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता राजेंद्र मांगलेकर (पार्वती शंकर, २५२४, बी वॉर्ड, मंगळवार पेठ) यांनी आणि त्यांच्या पतीने नीलेश यांच्याकडे त्यांच्या सांगण्यावरून २१ लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिले. त्यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे १.५ टक्के परतावा देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे नीलेश यांनी एप्रिल २०१९ पर्यंत परतावा दिला. त्यानंतर परतावा देणे बंद झाल्याने मांगलेकर यांनी नीलेशकडे विचारणा केली. त्यानंतर झालेल्या कराराप्रमाणे २.५ टक्के परतावा देण्याचे ठरले. नव्या करारपत्राप्रमाणे नीलेश याने काही महिन्यांसाठी परतावा दिला. त्यानंतर पुन्हा परतावा देणे बंद झाले. त्यानंतर मांगलेकर यांनी उर्वरित पैशांसाठी नीलेशकडे तगादा लावला. दरम्यान, नीलेश यांनी मूळ मुद्दलातील ५ लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम कधी परत करणार याबाबत मांगलेकर यांनी नीलेशकडे विचारणा केली. त्या वेळी नीलेश आणि पूर्वा यांनी वडणगे येथील त्यांचा प्लॉट ६ लाख २५ रुपयास खरेदी करून देतो, असे सांगितले. त्याचे खोटे खरेदीपत्रही केले; मात्र चौकशी केल्यावर हा प्लॉट आधीच एकाला विकल्याची माहिती समोर आली. नीलेश याने मांगलेकरांचे एकूण २० लाख ८० हजार रुपये अद्याप देणे आहे. नीलेश आणि पूर्वा यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT