फोटो - १७५५०
पोलिसास मारहाणप्रकरणी
तिघांना दोन वर्षे सक्तमजुरी
१ एप्रिल २०१८ ला व्हिनस कॉर्नरजवळ घडला होता प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघांना आज दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दिलावर रजाक मकानदार (वय २३, हुपरी, ता. हातकणंगले), सूलतान अस्तरआली सय्यद (२३), झाकीर बावरुद्दीन सय्यद (४५, दोघे जवाहरनगर, सरनाईक वसाहत) यांना शिक्षा सुनावली. खटल्यात ८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ॲड. शीतल रोटे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. पोलिस उपनिरीक्षक आर. ए. वाघमारे हे तपासी अधिकारी होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ही शिक्षा सुनावली.
संजय आनंदा पवार हे १ एप्रिल २०१८ ला व्हिनस कॉर्नर येथे कर्तव्य बजावत होते. या वेळी दिलावर चुकीच्या दिशेने वाहन चालवत आला. त्याला संजय यांनी हटकले व लायसन्सची मागणी केली. यावेळी त्याने फोन करून झाकीर आणि सूलतान यांना बोलावून घेत संजय यांना मारण्यास सुरुवात केली. त्यांच्या तोंडावर, पाठीत आणि पोटात फायटरने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले; तसेच त्यांच्या शर्टची बटनेही तुटली. त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल केला. खटल्यात एकूण आठ सक्षीदारांनी साक्ष दिली. संजय पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तिघांनाही दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.