कोल्हापूर

खटाळे, रासकर ९७ किलो गटात अंतीम फेरीत

CD

लोगो घेणे....
खटाळे, रासकर ९७ किलोगटात अंतिम फेरीत
अंतिम सामना शुक्रवारी; ३२ मल्‍लांनी लावली ताकद पणाला
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. ७ : येथे सुरू असलेल्या महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेदरम्‍यान आज जिल्‍हा क्रीडा संकुलात झालेल्‍या ९७ किलो वजनगटात सोलापूरच्‍या सुनील खटाळे आणि मुंबईच्‍या वैभव रासकर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. या वजनगटाचा अंतिम सामना शुक्रवारी होणार असून, यात कोण बाजी मारतो, याकडे सातारकरांसह कुस्‍तीशौकिनांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
जिल्‍हा क्रीडा संकुलात महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धा सुरू आहे. या स्‍पर्धेदरम्‍यान आज सायंकाळच्‍या सत्रात विविध वजनगटांबरोबरच महाराष्‍ट्र केसरीच्‍या लढती घेण्‍याचे संयोजकांनी जाहीर केले होते. त्यानुसार सायंकाळी पाचच्‍या सुमारास लढती सुरू झाल्‍या. स्‍पर्धेसाठी तयार केलेल्‍या गादी प्रकारातील एक क्रमांकाच्या आखाड्यावर ९७ किलो वजनी गटाच्‍या लढती घेण्‍यात आल्‍या. पंचांनी पुकारा करत त्‍या गटात खेळणाऱ्या मल्‍लांना उपस्‍थित करत त्‍यांच्‍या जोड्या जाहीर केल्‍या. प्राथमिक फेरीत ३२ मल्‍लांच्‍या १६ जोड्यांमध्‍ये लढत झाली. या लढती संपल्यानंतर त्‍यातील १६ मल्‍लांची गुणानुक्रमानुसार आठ जोड्या तयार करण्‍यात आल्‍या. जोडीतील प्रत्‍येक मल्‍ल गादी प्रकारात मिळवलेले कसब, ताकदपणाला लावत समोरच्‍याची ताकद आजमावत होता. या फेऱ्या पार पडल्‍यानंतर त्‍यातील ८ मल्‍लांच्‍या ४ जोड्या करत लढती घेण्‍यात आल्‍या. उपउपांत्‍य फेरीसाठीच्‍या लढती जाहीर करण्‍यात आल्‍या. त्यात सुनील खटाळे (सोलापूर) आणि तुषार ठोंबर (सातारा) यांच्‍यात कुस्‍तीत खटाळे विजयी झाला. त्यानंतर रोहित कारले (पुणे) आणि रमेश बहीरनाळ (बीड) यांच्‍यातील लढतील कारलेने बाजी मारली. धनाजी कोळी (वाशीम) व वैभव रासकर (मुंबई) यांच्‍यातील लढतीत रासकर, तर नीलेश केदारी (पुणे शहर) आणि सनिकेत राऊत (कोल्‍हापूर) यांच्‍यातील लढतीत राऊत विजयी झाला.
या लढती संपल्‍यानंतर उपांत्य फेरीसाठीच्‍या दोन जोड्या जाहीर करण्‍यात आल्‍या. त्यात सुनील खटाळे (सोलापूर) व रोहित कारळे (पुणे), तर वैभव रासकर (मुंबई) आणि सनिकेत राऊत (कोल्हापूर) यांच्‍यात लढत झाली. त्यात खटाळेने जास्‍तीचे २, तर रासकरने जास्‍तीचे ११ गुण मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत प्रवेश केलेल्‍या रासकर आणि खटाळे यांच्‍यात शुक्रवारी सायंकाळी अंतिम लढत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT