कोल्हापूर

राष्ट्राच्या प्रगतीचे सुकाणू युवकांच्या हाती - प्रा. पाटील

CD

येलूरला श्रमसंस्कार शिबिर
आंबा ः युवा पिढीच देशाचे खरे भांडवल आहे. राष्ट्राच्या प्रगतीचे सुकाणू युवकांच्या हाती असल्याचे प्रतिपादन प्रा. शिवाप्पा पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठ, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर - पेरीड व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संलग्नित अभ्यास केंद्र मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येलूरला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान’वर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. समाधान जाधव होते. प्रा. पाटील म्हणाले, ‘भारताची जगात मान उंचावण्याचे कार्य युवकच करू शकतात. युवकांची सकारात्मक ऊर्जा विधायक बदल घडवते.’ येलूरचे सरपंच संदीप पोवार, ग्रामसेवक रावसाहेब कोळी, प्रा. सुरेखा फडतरे, प्रा. लतिका जाधव, प्रा. प्रशांत भालसिंग, प्रा. भास्कर चिखलीकर उपस्थित होते. मानसी पाटील हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविक, ऋतुजा पाटील सूत्रसंचालन व अभिषेक जोंधळे यांनी आभार मानले. याकामी ममता जाधव, संजीवनी लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन ;पालिका वॉर्ड कार्यालयातील नागरिकांच्या फेऱ्या टळणार

तेजश्री प्रधानचा नजरेत भरणारा लूक! फ्रील साडी अन् खुललेलं रुप पाहून चाहते घायाळ, Viral Video

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

SCROLL FOR NEXT