कोल्हापूर

लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदान करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

CD

02094
लोकशाही बळकट करण्यासाठी
शंभर टक्के मतदान करा ः जिल्हाधिकारी

आंबा ता. २ ः नोकरीनिमित्त मुंबईत स्थलांतरित असलेल्या मतदारांना उपस्थित ठेवा. लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदान करा; असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. चाळणवाडी येथे मतदार बैठकीत ते बोलत होते.
पश्चिम भागातील तरूण वर्ग रोजगारासाठी पुण्या मुंबईत स्थलांतरित आहे. जागृती अभियानातून विद्यार्थ्यांनी आईबाबांना मतदान करण्यासाठी पत्रलेखनासारख्या राबविलेल्या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल; असा आशावाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी व्यक्त केला. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, तहसीलदार रामलिंग चव्हाण, गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार उपस्थित होते. दरम्यान यावेळी गत लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या गावांना भेटी देण्यात आल्या. आंबा, करूंगळे, गोगवे या गावांना भेटी देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी ए. एस. कटारे, रवी कुंभार, ग्रामसेवक सुभाष पाटील, धीरज कांबळे, तलाठी प्रसाद मोहिते, राजेंद्र लाड, संदीप पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT