कोल्हापूर

कासारी धरणाच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

CD

02096
...
कासारी धरणाच्या पाण्यात
बुडून युवकाचा मृत्यू
आंबा, ता. १०ः गजापूर येथील कासारी धरणाच्या जलाशयात अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महंमद रसूल शाडगुपी (वय १८, रा. बानसंद्रा, ता. सुर्वेकरी, जि. तुमकूर - कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद शाडगुपी हा गुरुवारी रात्री कुटुंबासह खासगी गाडीने विशाळगड दर्शनासाठी आला होता. रात्रभर प्रवास केल्यानंतर हे कुटुंबीय धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी थांबले. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने महमंद जलाशयात बुडाला. डोळ्यासमोर आपल्या मुलाचा झालेला मृत्यू पाहून आई व दोन बहिणींनी हंबरडा फोडला. दुपारी दोनच्या सुमारास कोल्हापूर येथील आपत्कालीन यंत्रणा दाखल झाली. दीड तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह पाण्याबाहेर काढला. मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT