कोल्हापूर

‘डी. वाय.’ ची 15 जानेवारी अखेरची ऊस बिले जमा : आ.सतेज पाटील

CD

00882
‘डी. वाय.’ची १५
जानेवारीअखेरची बिले जमा

असळज, ता. ६ : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याने चालू हंगामात १ ते १५ जानेवारी पंधरवड्यात गाळप उसाचे २० कोटी ५० लाख ८६ हजारांचे ऊस बिल ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप केलेल्या ६८ हजार ३६२ मे. टन उसाचे ३००० रुपयांप्रमाणे होणारे बिल आदा केले आहे.
ते म्हणाले, ‘५ फेब्रुवारीअखेर ४ लाख १५ हजार ७४० टन ऊसाचे गाळप करुन ४ लाख ५० हजार १५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. सहवीज निर्मिती प्रकल्पातून हंगामात आजअखेर ३ कोटी ८४ लाख ३९ हजार ५१२ युनिट वीजनिर्मिती केली असून कारखाना वापर वजा जाता २ कोटी ५९ लाख ९२ हजार युनिट वीज निर्यात केली. गाळप उद्दीष्ट पूर्ततेसाठी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी पिकवलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election Voting Live : राज्यात २९ महापालिकेसाठी आज मतदान, मुंबई, नाशिक, कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, शहराच्या कारभाऱ्यांचा होणार फैसला

माणुसकीला सलाम! कृष्‍णा नदीत उडी घेतलेल्या नवविवाहितेला जीवदान; कऱ्हाडमध्ये युवकांनी लावली प्राणाची बाजी, थरारक घटना..

Municipa Election Voting Maharashtra : कोल्हापूर, इचलकरंजीत रात्रीस खेळ चाले कार्यक्रमानंतर मतदानास सुरूवात, टोकाच्या ईर्षेमुळे जिल्ह्यात हायव्होल्टेज ड्रामा

Satara politics: साताऱ्यात भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र?; शिवसेना अन् दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून गतिमान हालचाली!

Elections 2026: मतदानाआधीच राजकीय वातावरण पेटलं! नागपूरात BJP उमेदवारावर हल्ला तर नाशकात शिंदेंच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT