कोल्हापूर

बंधा-याचा पिलर कोसळल्याने रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद

CD

00967
पळसंबे : येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पिलर कोसळला आहे.
...

पळसंबेत अवजड वाहतुकीसाठी
रस्ता बंद केल्याने नागरिकांची गैरसोय

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पिलर कोसळला

असळज, ता.१० : पळसंबे (ता.गगनबावडा) येथील कुंभी नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पिलर कोसळल्याने रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
या बंधाऱ्यावरुन पळसंबे, नाळेवाडी, चाफेवाडी, पेजलेकरवाडी या वाड्या वस्तीवरील लोकांची ये-जा असते. पळसंबे येथे रामलिंग तीर्थक्षेत्र असल्याने अनेक भाविक या ठिकाणी येतात. बंधाऱ्याचा पिलर कोसळल्याने घर बांधणाऱ्या नागरिकांना व शेतीच्या कामासाठी अवजड वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना वाहतूक कशी करावयाची, असा प्रश्न पडला आहे. या बंधाऱ्यावर पावसाळ्यात वारंवार पाणी येते. त्यामुळे पुराच्या कालावधीत बऱ्याच वेळा हा मार्ग बंद असतो. कोसळलेल्या पिलरची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पाटबंधारे विभागाने ह्या बंधाऱ्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
...

‘दोन महिन्यांपूर्वीच पळसंबे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करुन याबाबतचा अहवाल पाठवला आहे. पावसाळ्यापूर्वी बंधारा दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे.
अजिंक्य पाटील, शाखाधिकारी, कळे पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT