कोल्हापूर

कोदे येथे गवा रेड्याचा मृत्यू

CD

कोदे येथे गवा रेड्याचा मृत्यू

असळज, ता.२९ : कोदे (ता.गगनबावडा) येथील जंगल हद्दीनजीक विहीरीत पडलेल्या गवा रेड्याचा अखेर मृत्यू झाला. तहान भागविणाऱ्या पाण्यानेच गवा रेड्याचा जीव घेतला. गगनबावडा वनविभागाने केलेल्या प्रयत्नांना अपयश आले.
गेल्या काही दिवसांपासून कमालीचा उष्मा वाढला आहे. शनिवारी पहाटे पाण्याच्या शोधार्थ गवा येथील मानवी वस्तीकडे आला होता. गगनबावडा तालुक्यातील कोदे येथील युवराज शंकर कुंभार यांच्या मालकीच्या विहीरीत तो उतरला होता. त्या विहिरीतून त्याला पुन्हा बाहेर पडता आले नाही. सकाळी काही लोकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी वनविभागास कळविले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने गवा बाहेर येण्यासाठी मार्ग केला. गगनबावडा वनविभागाच्या वतीने वनपाल आर. ए. ऊलपे, प्रकाश खाडे, मारुती व्होवळे यांनी यासाठी प्रयत्न केले.
पण तोपर्यंत खूप उशिरा झाला होता. पाण्यातच त्याचा जीव गेला होता. तहान भागविणाऱ्या पाण्यानेच त्याचा जीव घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT