कोल्हापूर

कुंभी मध्यम प्रकल्पात 39 टक्के पाणीसाठा शिल्लक

CD

01021

कुंभी मध्यम प्रकल्पात
३९ टक्के पाणीसाठा शिल्लक

साळवण, ता. ५ : गगनबावडा, पन्हाळा व करवीर तालुक्यांतील काही गावांना सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्पात ४ जूनअखेर ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील उर्वरित कोदे, वेसरफ व अणदूर लघुपाटबंधारे प्रकल्पातही अनुक्रमे १४, १० व ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कुंभी मध्यम प्रकल्पात शिल्लक पाणीसाठा पाहता हा साठा लाभक्षेत्रासाठी जूनअखेर पुरेल, अशी माहिती पाटबंधारे विभाग कळेचे शाखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी दिली.
गगनबावडा तालुक्यात कुंभी या प्रमुख मध्यम प्रकल्पासह अणदूर, कोदे व वेसरफ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. कुंभी प्रमुख धरण असून याची पाणी साठवण क्षमता २.७१ टीएमसी आहे. गगनबावड्यासह पन्‍हाळा व करवीर या तीन तालुक्‍यातील हजारो एकरातील पिके सिंचनासाठी या प्रकल्पावर अवलंबून आहेत. या प्रकल्पातील पाणी कुंभी नदीत सोडले जाते. कोदे लघु प्रकल्‍पात ०.८५ दलघमी (१४ टक्के), अणदूर लघु प्रकल्पात १.८४ दलघमी (३२ टक्के), वेसरफ लघु प्रकल्पात ०.३६ दलघमी (१०.६८ टक्के) तर कुंभी मध्यम प्रकल्पात ३०.०२ दलघमी (३९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

कोट :
तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्पात ३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पावसाळा लांबला तरीही जूनअखेर पाणीसाठा पुरेल.
- अजिंक्य पाटील, शाखाधिकारी, कळे पाटबंधारे विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT