कोल्हापूर

गगनबावडा तालुक्यात पावसाची हजेरी

CD

गगनबावडा तालुक्यात पावसाची हजेरी
असळज, ता.१६ : गेले काही दिवस तालुक्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. शुक्रवारी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु झाल्याने गगनबावडा तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. भातरोप लागणीसाठी टाकलेल्या तरव्यांना जीवदान मिळाले आहे.
जूनचा पहिला पंधरवडा संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत होता. विद्युत मोटारीच्या साह्याने पाणी उपसा करून रोप लागण्यासाठी तरव्यांची पेरणी केली होती. पाटबंधारे विभाग वेळोवेळी पाणी उपसाबंदी आदेश लागू करत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. पावसाने आजअखेर दिलेल्या हुलकावणीने केव्हा एकदाचा पाऊस सुरू होतो याकडे बळीराजाचे डोळे लागून राहिले होते. शुक्रवारी सकाळपासूनच तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT