कोल्हापूर

गगनबावडा तालुका शिक्षक भारती संघटनेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात

CD

01076
गगनबावडा तालुका शिक्षक भारती
संघटनेचा २२ वा वर्धापन दिन

साळवण, ता. ५ : टेकवाडी (ता. गगनबावडा) येथे गगनबावडा तालुका शिक्षक भारती संघटनेचा २२ वा वर्धापन दिन झाला. याप्रसंगी बोलताना शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बॅंकेचे संचालक गजानन कांबळे म्हणाले, ‘२००१मध्ये वाड्या-वस्त्यांवरील वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाने वाडी -वस्तीवर वस्तीशाळा सुरु केल्या. अल्प मानधन व ग्रामपंचायतीद्वारे नियुक्ती देऊन शिक्षकांना संधी दिली. २००१ ते २०१४ अखेर शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करुन वस्तीशाळा शिक्षकांना न्याय देण्याचे काम शिक्षक भारती संघटनेने केले. या शिक्षक बांधवांनी अविरत कष्ट घेऊन, डोंगरकड्या कपारीत चालत जाऊन ग्रामीण भागामध्ये गुणवत्तेची द्वारे विद्यार्थ्यांसाठी खुली केली.
प्रास्तविकात तालुकाध्यक्ष भाऊ भोसले यांनी २२ वर्षांमध्ये राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचा, कार्याचा त्यांनी आढावा घेतला. वर्धापन दिनानिमित्त गगनबावडा तालुक्यात वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप यासह विविध उपक्रम झाले. यावेळी राज्य संघटक दशरथ गावडे, उपाध्यक्ष रवींद्रनाथ पारगावकर, कार्याध्यक्ष के. डी. जाधव व तालुक्यातील शिक्षक भारतीचे शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

SCROLL FOR NEXT