कोल्हापूर

कुंभी धरणक्षेत्रातील पावसाने ओलांडला एक हजार मिलीमिटरचा टप्पा

CD

कुंभी धरणक्षेत्रातील पावसाने
ओलांडला एक हजार मिमीचा टप्पा

धरणात १ टीएमसी पाणीसाठा; कोदे धरण निम्मे भरले

असळज, ता.६ : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी पावसाच्या आगार असलेल्या गगनबावडा तालुक्यातील लखमापूर येथील कुंभी धरणक्षेत्रातील पर्जन्यमानाने एक हजार ‍मिलीमिटरचा टप्पा ओलांडला आहे. कुंभी धरणक्षेत्रात आतापर्यंत १००३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. कुंभी मध्यम तर कोदे लघु प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कुंभी प्रकल्पात १ टीएमसी पाणीसाठा झाला आहे; तर कोदे लघुप्रकल्प ५० टक्के भरला आहे.
जूनचे पहिले तीन आठवडे कोरडे गेले. जूनच्या अखेरच्या आठवड्यात गगनबावड्यात पावसाला सुरुवात झाली. मात्र यातही सातत्य न राहता पावसाची उघडझाप होत राहिली. मात्र दोन आठवड्यात झालेल्या पावसाने तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कुंभी धरण क्षमतेच्या ३९ टक्के भरले आहे. कोदे धरणक्षेत्रात ९४२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यात भात रोपलागणीला गती आली आहे. विद्युत मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसा करुन बहुतांशी शेतक-यांनी रोपलागणी पूर्ण करत आणल्या आहेत. मात्र माळरानातील रोपलागणीसाठी अद्याप म्हणावे तसे पाणी नसल्याने त्या रोपलागणी खोळंबल्या आहेत.
दरम्यान आज गुरुवारी दिवसभर पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत कुंभी धरणक्षेत्रात ११५ मिमी तर कोदे धरणक्षेत्रात ९३ मिमी पावसाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT