कोल्हापूर

निवडेतील भजन स्पर्धेत मांडुकलीचे विठ्ठल रुक्मीणी भजनी मंडळ प्रथम

CD

02011
निवडेतील भजन स्पर्धेत
मांडुकलीचे मंडळ प्रथम

गगनबावडा, ता. ९ : निवडे (ता. गगनबावडा) येथील कै. अनिल कला, क्रीडा, सांस्कृतिक तरुण मंडळ व कापर्लिंग भजनी मंडळाने घेतलेल्या संगीत भजन स्पर्धेत मांडुकलीतील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत एकूण १५ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल असा : विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ मांडुकली (प्रथम), जय भवानी भजनी मंडळ शेणवडे (द्वितीय), माऊली भजनी मंडळ म्हारुळ व बालविठ्ठल भजनी मंडळ माजगाव (तृतीय विभागून), हनुमान भजनी मंडळ वाघवे (चतुर्थ). विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, चार हजार, तीन हजार, एक हजार व प्रत्येकी स्मृतिचिन्ह बक्षीस दिले.
जिल्हा बँकेचे माजी चेअरमन पी. जी. शिंदे, माजी सभापती एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धा पार पाडण्यासाठी संजय पाटील, मारुती पाटील, गणपती पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, रणजित पाटील, मारुती पाटील, तानाजी पाटील, महादेव पाटील व चंद्रकांत डेगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी तर संजय पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT