02416
सूर्यफूल पिकांनी टाकली मान
गगनबावडा तालुक्यातील चित्र; मका, भुईमुगाला कूज
सकाळ वृत्तसेवा
गगनबावडा, ता. २७ : गगनबावडा तालुक्यात मागील आठवडाभर संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुर्यफूल, मका, भुईमूग, वैशाख मूग ही उन्हाळी पिके शेतातच असून ती कुजू लागली आहेत. उन्हाळी पिकांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत तर जनावरांसाठीचा साठवणूक केलेला वाळलेला चारा भिजल्यामुळे तालुक्यातील शेतक-यांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसामुळे शेतीची पेरणीपूर्व कामेदेखील खोळंबली आहेत.
तालुक्यात ऐन पावसाळ्याप्रमाणे सतत संततधार पाऊस होत आहे. याचा फटका तालुक्यातील उन्हाळी पिकांना बसला आहे. दररोजच्या संततधारेने हातातोंडाशी आलेली पिके कुजू लागली आहेत. चार महिन्यांत या पिकांसाठी शेतक-यांनी हजारो रुपयांचा खर्च केला होता; मात्र ही पिके काढणीस आल्यानंतर मॉन्सूनपूर्व पावसाला जोरदार सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे प्रमाण जोरदार असल्याने ही पिके आता शेतक-यांच्या हातास लागणार नाहीत. खरीप पेरणीसाठी जमिनी तयार नसल्यामुळे शेतकरी वर्गाची जीवाची घालमेल वाढली आहे. पाऊस थांबणार कधी, पेरणी, घात व बी-बियाणे याबाबतच्या प्रश्नांनी शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. त्यामुळे शेतीकामांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
चौकट
भरपाई मिळण्याची गरज
काही शेतक-यांची जनावरांची सुकी वैरण शेतात असून ती कुजू लागली आहे. त्यामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.