कोल्हापूर

गगनबावडा तालुक्यातील जनतेच्या हितासाठी तत्परतेने‌ काम करणार : आमदार चंद्रदीप नरके

CD

03401
गगनबावडा : येथील आगारास नवीन पाच बसेसच्या लोकार्पणप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, पी. जी. शिंदे, तहसीलदार रूपाली सूर्यवंशी आदी.
-------------------------
गगनबावडा आगारात
नवीन पाच बसेसचे लोकार्पण
गगनबावडा, ता. ८ : नवीन गाड्यांमुळे आगाराचा बसेसचा प्रश्न मार्गी लागला आहे. तालुक्यातील जनतेच्या हितासाठी तत्परतेने‌ काम करणार असे अभिवचन करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिले. गगनबावडा एस.टी.आगारास नवीन पाच गाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पी. जी. शिंदे‌ अध्यक्षस्थानी होते.
स्थानिक जनतेच्या मागणीनुसार देवदर्शन, बंद पडलेल्या फेऱ्या नव्याने सुरू करणे, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रासंगिक करार याचे आगाराने काटेकोर नियोजन करावे, लवकरच आणखी नवीन पाच गाड्या या आगारास देणार असल्याचे अभिवचन आमदार नरके यांनी दिले.
आगारप्रमुख सुरेश शिंगाडे यांनी‌ प्रास्ताविक केले. आमदार नरके यांच्या पुढाकाराने यापूर्वी आगारात दहा नवीन, तर यावेळी पाच अशा नवीन १५ गाड्या प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या सात अशा एकूण २२ गाड्या आगाराकडे उपलब्ध असून, लवकरच या आगारास उभारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, मानसी कांबळे,एकनाथ शिंदे, आनंदा पाटील, पांडूरंग पाटील, संदीप पाटील, दादू पाटील, पी. आर. चौगले, सरपंच संतोष पाटील, ए. बी. पाटील, संदीप म्हस्कर, समिर तांबोळी, खुतबुद्दीन म्हालदार, अरुण चव्हाण, जावेद अत्तार, नारायण पाटील, विश्वनाथ पोतदार, पांडुरंग पाटील, सुनील पडवळ, संदिप पाटील, केरबा पाटील, विलास पाटील, राजाराम पाटील, इंद्रजित मेंगाणे, विनायक मोहिते, पांडुरंग सरनोबत, सतीश‌ दळवी, सुजित खोराटे, बाबूराव पाटील, रामचंद्र सारंग आदी उपस्थित होते. वाहतूक निरीक्षक अक्षय मोरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai News: भुयारी मार्गात अडथळा, मोरबे जलवाहिनी हलवणार; कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी

मूड खराब आहे? कामाचा ताण आलाय? तर ऑफिसला दांडी मारा! 'या' कंपनीने सुरू केली ‘Unhappy Leave’ पॉलिसी

Samagra Shiksha Abhiyan : पुणे जिल्ह्यासह राज्यातील समग्र अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या वीस वर्षाचा वनवास अखेर संपला

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला ३७ खासदारांची दांडी, नेमकं प्रकरण काय?

कोब्राने फणा काढला, मुंगूस भिडला; कुणीही माघार घेईना, थरारक लढतीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT