कोल्हापूर

‘बिद्री’च्या निवडणूकीला विरोध का

CD

01777
बिद्री : येथील साखर कारखान्याची निवडणूक तत्काळ घ्यावी या मागणीसाठी कोल्हापूर-गारगोटी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.


बिद्री कारखाना निवडणुकीसाठी
गारगोटी-कोल्हापूर मार्ग रोखला
बिद्री, ता. १ : आमदार प्रकाश आबिटकर यांचा बिद्री कारखान्याची निवडणूक पावसाळ्यात घेतल्यास काय अडचण आहे?, असा सवाल शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी केला. बिद्री (ता. कागल) येथे साखर कारखान्याची निवडणूक तत्काळ घ्यावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे गारगोटी-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली. कार्यकर्त्यांनी आमदार आबिटकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ‘बिद्री’चा निवडणूक कार्यक्रम लवकर जाहीर करावा, अशी मागणी केली.
उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले, ‘आमदार आबिटकर यांनी राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पावसाळ्यात निवडणूक न घेता ती पुढे ढकलावी अशा आशयाचे पत्र दिले आहे. ते पत्र त्यांनी मागे घेऊन निवडणूक रिंगणात उतरावे.’’
या वेळी अविनाश शिंदे, उत्तम पाटील, के. के. राजीगरे, वसंत कांबळे, बापूसो किल्लेदार, मारुती गिरी, शांता जाधव, रंजना आंबेकर, मोनिका सुर्वे, सुषमा पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT