कोल्हापूर

बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरिक्षण आदेशाचे स्वागतच :

CD

‘बिद्री’च्या लेखापरीक्षण
आदेशाचे स्वागतच
अध्यक्ष के. पी. पाटीलः कोणताही चुकीचा कारभार केलेला नाही
बिद्री ता. १२: ‘बिद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात कारखाना व्यवस्थापन कोणत्याही प्रकारच्या लेखापरीक्षणास तयार असल्याचे आम्ही अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने होणाऱ्या लेखापरीक्षणाचे स्वागतच करत आहोत. मात्र, विरोधकांनी शासकीय यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, अशी आमची अपेक्षा आहे,’ असे कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरीक्षणास स्थगिती देण्याचा सहकारमंत्र्यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. या पार्श्वभूमीवर के. पी. पाटील यांनी भूमिका मांडली.
पत्रकात म्हटले आहे, बिद्रीच्या निवडणुकीत कारखाना व्यवस्थापनाच्या कारभारावर टीका किंवा आरोप करण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे उपलब्ध नव्हते. विरोधी मंडळींनी लेखापरीक्षणातील काही मुद्यांचा चुकीचा अर्थ लावून हवा तसा चौकशी अहवाल करण्यासाठी शासकीय यंत्रणेवर दबाव आणून चुकीचा अहवाल तयार करून घेतला. या अहवालानुसार चौकशी करून कारखान्यावर प्रशासक मंडळ नेमण्याचे कुटील कारस्थान होते. याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या लेखापरीक्षणास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली असून, कारखान्यास दाद मागण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे. कारखान्यामध्ये आम्ही कोणताही चुकीचा कारभार केलेला नसून लेखापरीक्षण करण्याच्या आदेशाचे आम्ही स्वागत करत आहोत. कारखाना प्रशासनाकडून सबंधित लेखापरीक्षकांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. लेखापरीक्षणामध्येही कारखान्याचा कारभार योग्य असल्याचेच निदर्शनास येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

५०० हून जास्त विकेट्स, पण मानसिक आरोग्याशी संघर्ष! इंग्लंडच्या ३२ वर्षीय खेळाडूने घेतली धक्कादायक निवृत्ती

Mumbai News: आदिवासी विद्यार्थी राज्यपाल भवनावर धडकणार, पोलिसांचा बंदोबस्त तैनात; कारण काय?

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Numerology: पैसा-अडका असला तरी दिखावा नाही! साधं जगणं पसंत करतात ‘या’ ३ मूलांकाचे लोक; स्वभाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT