कोल्हापूर

मुदाळतिट्टा येथे काँक्रीट रस्ता धोकादायक

CD

02378
मुदाळतिट्टा : येथील अर्धवट स्थितीतील कामांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते.

मुदाळतिट्टा येथे
सातत्याने कोंडी
रस्त्यावरील उंचवटे ठरताहेत घातक
दत्तात्रय वारके : सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. १२ : कागल, राधानगरी व भुदरगड तालुक्यांना जोडणाऱ्या मुधाळतिट्टा येथील रस्त्याची अपुरी कामे अपघाताला निमंत्रण देत आहेत. या अपुऱ्या कामांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील काँक्रिटच्या रस्त्याला बाजूपट्ट्याच नसल्याने रस्त्याला निर्माण झालेला उंचवटा धोकादायक ठरत आहे. यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत.
कोल्हापूर-गारगोटी व निपाणी-राधानगरी हे दोन महत्त्वाचे राज्यमार्ग मुदाळतिट्टा येथे जोडले गेले आहेत. याठिकाणी नवीन रस्त्याचे काम सुरू असून ते अर्धवटच राहिले आहे. सिमेंट कॉक्रिटीकरण केलेल्या रस्त्याला बाजूपट्टया न केल्याने रस्ता खचला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला उंचवटे निर्माण झाले आहेत. हे उंचवटे चालकांना दिसत नसल्यामुळे येथून वाहतूक करणे कसरतीचे झाले आहे.
रस्त्याच्या बाजूच्या गटाराशेजारील कामे पूर्ण झाली नसल्यामुळे येथे वाहन पार्किंगसुद्धा करता येत नाही. काँक्रिटच्या अपुऱ्या रस्त्यावरून चारही मार्गावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या उंचवट्यावर एखादे वाहन अडकले तर ते रस्ता पास करेपर्यंत येथे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे प्रवासी वर्गाला वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. येथे राहिलेल्या रस्त्याचा अपुरा भाग पूर्ण करून घ्यावा, अशी मागणी वाहनधारकांतून जोर धरू लागली आहे.
------------
कोट
अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. रविवार व आमावास्याच्या दिवशी वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याचा वाहनधारक व प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
- अक्षय घोडके प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT