कोल्हापूर

उत्तरकार्यावेळी केले १५० रोपांचे वाटप

CD

02386
वाळवे खुर्द : येथे आईच्या उत्तरकार्यानिमित्त रोपांचे वाटप करताना बाळासाहेब पाटील, रंगराव पाटील, आरती पाटील आदी.
.......
उत्तरकार्यावेळी केले
१५० रोपांचे वाटप

बिद्री, ता. १६ : अनेकांकडून उत्तरकार्यावेळी भांडी वाटप तसेच इतर अनावश्यक खर्च केला जातो. मात्र, अशा गोष्टींना फाटा देत वाळवे खुर्द (ता. कागल) येथील संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आईच्या उत्तरकार्यावेळी पर्यावरण संवर्धनाचा वसा जपला. त्यांनी पाहुण्यांना हापूस आंब्याच्या १५० रोपांसह वड, पिंपळ, बेल या झाडांची रोपे भेट दिली.
बाळासाहेब पाटील यांच्या आई सोनाबाई पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जन दिवशी प्रचलित प्रथांना फाटा देत रक्षा नदीत विसर्जित न करता शेतात टाकत त्यांनी पाणी प्रदूषण टाळले. त्यानंतर त्यांच्या उत्तरकार्याला आंब्याची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. त्याला घरच्या लोकांनी पाठिंबा दिला. यावेळी आलेले नातेवाईक, पै-पाहुणे व मित्रमंडळींना आंब्याच्या १५० रोपांसह वड, पिंपळ, बेल ही रोपे भेट दिली. याशिवाय गावच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला आणि स्मशानभूमीतही वड तसेच पिंपळाची रोपे लावण्याचाही निर्णयही पाटील यांनी घेतला आहे. यावेळी माजी सरपंच शिवराज पाटील, माजी उपसरपंच भरत पाटील, मुदाळचे उपसरपंच के. ए. पाटील, रंगराव पाटील, आरती पाटील, सागर पाटील, डॉ. एम. ए. पाटील, आदींसह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT