कोल्हापूर

गारगोटी-कोल्हापूर मार्गावर होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर

CD

गारगोटी-कोल्हापूर मार्गावर
होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची जनतेतून मागणी

सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. २१ : मुंबईतील घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर गारगोटी-कोल्हापूर राज्यमार्गावरील रस्त्याकडेला व अनेक ठिकाणी नागरी वस्तीत इमारतींवरील शेकडो होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची मागणी जनतेतून होत आहे.
गारगोटी-कोल्हापूर या ६० किलोमीटर अंतराच्या मार्गावर दोन्ही बाजूला असणाऱ्या शेतवडीत, तर काही ठिकाणी नागरी वस्तीत इमारतींवर जाहिरात एजन्सींनी संबंधित शेतकऱ्यांना व घरमालकांना ठराविक मोबदला देऊन शेकडो भलीमोठी होर्डिंग उभारली आहेत. ही होर्डिंग रस्त्याच्या बाजूला असून, बऱ्याचदा अपघाताला निमंत्रण देत आहेत. अशा प्रकारची होर्डिंग कोसळून विजेचे शॉर्ट सर्किट होण्याच्या घटना घडल्या आहेत. होर्डिंग लावताना ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आहे की नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, याला कोणाकडून परवाना घेतला आहे का, याबाबत कोणतीही खबरबात नाही. होर्डिंग कित्येक वर्षांपूर्वी उभाल्याने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. वळवाच्या मुसळधार पावसामध्ये अनेक वेळा अशी होर्डिंग उखडून पडली आहेत. सुदैवाने या होर्डिंगच्या परिसरात शेतकरी न थांबल्याने दुर्घटना घडलेली नाही. मात्र घाटकोपर येथे घडलेल्या घटनेनंतर या होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा होर्डिंगची माहिती घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

'सेटवर वर्चस्व दाखवलं जात होतं' अमृताने सांगितला 'तुमचं आमचं सेम असतं' मालिकेच्या सेटवरचा किस्सा, म्हणाली...'वजनावरुन मला नेहमी...'

Mahabaleshwar Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळली; 6 मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचा 'हा' नवा थरारक प्लॅन, दोघांचे मृतदेह काढले बाहेर

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड; शून्यावर बाद होताच 'या' परदेशी खेळाडूची बरोबरी; नेमकं काय घडलं

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

SCROLL FOR NEXT