कोल्हापूर

रोहिणीचा पेरा अखेरच्या टप्प्यावर

CD

02427

बिद्री परिसरातील शिवारात
भात पेरणीासाठी लगबग

बिद्री ता. २ : कागल तालुक्याच्या पश्चिमेकडील बिद्रीसह बोरवडे, फराकटेवाडी, उंदरवाडी, वाळवे खुर्द परिसरात भात पेरणी अखेरच्या टप्प्यात आली आहे. शेत शिवारात शेतकरी, मजुरांची लगबग असल्याचे चित्र दिसून येते.
यंदा भात बियाणे व तणनाशकांच्या दरात किरकोळ पाच ते सात टक्के दर वाढ झाल्याची माहिती येथील ज्ञानराज कृषी सेवा केंद्राचे मालक स्वानंद रामाने यांनी दिली. परंपरागत भात बियाण्यांचा पेरा न करता कमी दिवसात येणारे व ज्यादा उत्पन्न देणारी संकरित भात बियाण्यांना मागणी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक जया, दोडका, हावळे, काळा जिरगा, फुले समृद्धी, रक्त साळी ही भातांची वाण कालबाह्य झाली आहेत. यंदा संकरित १०० ते १२० दिवसांत येणारी भात बियाणे अवनी, अनोखी, सुंदर, जगती, सारथी, सुप्रीम,सोना, राशी पूनम तसेच १२५ ते १३० दिवसांत येणारे नवीन संकरित भात बियाणे अजिता, शुभांगी, अमुघ, अस्मिता, गोरखनाथ, अवनी, बाहुबली, एनपीए १२५, एम.पी.आर. ५०५ भात बियाण्यांना चांगली मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT