2709
बिद्री : बोरवडे (ता. कागल) येथील भगतसिंग तरुण मंडळाच्या दुर्गामाता मिरवणुकीत सहभागी झालेले ग्रामस्थ.
...........
बिद्री, बोरवडे परिसरात
दुर्गामातेची प्रतिष्ठापना
बिद्री, ता. ३ : घटस्थापनेच्या आजच्या दिवशी कागल तालुक्यातील बिद्री, बोरवडेसह परिसरातील गावांत भक्तिपूर्ण व उत्साही वातावरणात दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. टाळ-मृदंगाचा गरज आणि भजनी गीतांच्या सुरात दुर्गामातेचे मिरवणुकीने मंडळांच्या मंडपात आगमन झाले.
बोरवडेतील भगतसिंग तरुण मंडळाच्या मूर्तीचे मिरवणुकीने उत्साहात आगमन झाले. यावेळी महिलांनी पारंपरिक वेषात सहभागी होत टाळांच्या निनादात मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बिद्री येथील जय शिवराय मंडळाने टाळ-मृदंगाच्या गजरात भजन करीत मूर्तीची मिरवणूक काढली. नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.