कोल्हापूर

अल्पवयीन दुचाकीस्वारांची वाहने सुसाट

CD

संग्रहित फोटो लावणे...
...........
अल्पवयीन दुचाकीस्वारांची वाहने सुसाट

पादचाऱ्यांच्या जीवाला धोका ः पोलिसांनी कारवाई करण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. १९ : ग्रामीण भागात अल्पवयीन दुचाकीस्वारांची वाहने धूम स्टाईल धावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून, अशा दुचाकीस्वारांना वचक बसविण्यासाठी पोलिसांसह खुद्द पालकांनाही लक्ष घालावे लागणार आहे. ग्रामीण भागातील रस्त्यावर धावणाऱ्या अशा अनेक वाहननधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे.
वाहतुकीचे नियम बाजूला सारून अल्पवयीन मुले-मुली बिनधास्त वाहने चालविताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडत असला तरी अपेक्षेनुसार कारवाई होताना मात्र दिसत नाही. अल्पवयीनांकडून नियम पायदळी तुडवण्याचे प्रकार घडत आहेत. अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी दिल्यास आणि अपघात झाल्यास वडिलांना कारावासाची कारवाई होऊ शकते, दंड होऊ शकतो, हे माहिती असूनही अशा पद्धतीने गाड्या देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार १६ वर्षांवरील मुलांना गिअर नसलेली आणि १८ वर्षांवरील मुलांना गिअर असलेली दुचाकी चालविण्याची परवानगी आहे. मात्र, ग्रामीण भागात सर्रास अल्पवयीन मुले-मुली दुचाकी चालवितानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक दिसत नाही. तसेच वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देणारी यंत्रणाही आपले काम योग्य पद्धतीने करीत आहे का, असा प्रश्नही नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. मात्र, मुलांची हौस भागविण्यासाठी अनेक पालक आपल्या मुलांना दुचाकी देतात आणि पाल्याच्या हट्टापायी त्याच्यासह पादचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण करतात.
भरदाव वेगाने गाडी चालविण्याचे व ट्रिपल सीटचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. विशेषतः कॉलेज तरुण-तरुणींची संख्या यामध्ये मोठी असून, याकडे वाहतूक प्रशासन कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
............
चौकट......
चालक परवाना नसताना युवक सर्रास दुचाकी चालविताना दिसतात. त्यांना केवळ हटकण्यापलीकडे पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत. सापडल्यानंतर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा केवळ नाममात्र दंड आकारला जात असल्याने अशा युवकांची हिंमत वाढली आहे. परिणामी छोट्या-छोट्या अपघातांची संख्या वाढली आहे. बऱ्याच वेळा कोणावर तरी रुबाब मारण्यासाठी सुसाट जाण्याची प्रथा वाढीस लागले आहे.
- सचिन खाडे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT