कोल्हापूर

सहकारी संस्थांनी सभासद हिताचे कार्यक्रम राबवावेत

CD

3132
बिद्री : येथील संत बाळूमामा सेवा संस्था व नामदार हसनसो मुश्रीफ दूध संस्था यांच्या उद्‍घाटनप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, मनोज फराकटे, भूषण पाटील आदी.
................
सहकारी संस्थांनी सभासद
हिताचे कार्यक्रम राबवावेत

मंत्री मुश्रीफ ः बिद्रीत विविध सहकारी संस्थांचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. २५ : ‘राज्याला सहकारी चळवळीचा मोठा वारसा लाभला असून, सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी या संस्था आधारभूत ठरल्या आहेत. संस्थेचे सभासद मालक, तर संचालक विश्वस्त मानून काम केले तर संस्था प्रगतिपथावर जाते. अशा संस्थांनी पारदर्शकपणे कारभार करून सभासदांच्या हिताचे कार्यक्रम राबवावेत,’ अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
बिद्री (ता. कागल) येथील संत बाळूमामा सेवा संस्था, नामदार हसनसो मुश्रीफ दूध संस्था, संत बाळूमामा मका प्रक्रिया संस्था, संत बाळूमामा कडधान्य प्रक्रिया संस्था, संत बाळूमामा भाजीपाला प्रक्रिया संस्था या नव्याने सुरू झालेल्या सहकारी संस्थांचे उद्‍घाटन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सलग सहावेळा आमदारपदी आणि नवव्यांदा कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल मुश्रीफ यांचा माजी सरपंच शिवाजी पाटील आणि माजी उपसरपंच राजाराम चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘बिद्री’चे उपाध्यक्ष मनोज फराकटे, माजी सभापती जयदीप पोवार, माजी उपसभापती भूषण पाटील, शशिकांत खोत, सुनीलराज सूर्यवंशी, देवानंद पाटील, पांडुरंग पाटील, सरपंच पूजा पाटील, उपसरपंच सागर कांबळे, माजी सरपंच पांडुरंग चौगले, अण्णासाहेब पोवार, राजेंद्र चौगले, माजी उपसरपंच पांडुरंग कळमकर, विशाल चौगले, दिगंबर पाटील, अमोल चौगले, संदेश चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
एम. एम. चौगले यांनी स्वागत केले. चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. विश्वनाथ डफळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT